पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई -  ""कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत,'' असे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले. 

मंत्रालयात आज आयोजित पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भातील बैठकीत ते बोलत होते. या वेळी अपर मुख्य सचिव सतीश गवई उपस्थित होते. 

मुंबई -  ""कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी सर्व विभागांनी प्रयत्न करावेत,'' असे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले. 

मंत्रालयात आज आयोजित पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भातील बैठकीत ते बोलत होते. या वेळी अपर मुख्य सचिव सतीश गवई उपस्थित होते. 

श्री. कदम म्हणाले, ""नदीमध्ये सांडपाणी सोडणे, कचरा टाकणे, कारखान्यांचे प्रदूषित पाणी सोडणे यावर प्रदूषण विभागाने नियंत्रण ठेवले पाहिजे. जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, कारखाना परिसर, ग्रामपंचायत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे लावा. प्लास्टिकच्या कॅरिबॅग वापरू नका, प्लास्टिक कॅरिबॅग बनविणारे कारखाने बंद करा, पर्यावरणासाठी प्राप्त निधीतून सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा निर्मूलन यावरच खर्च करा.'' 

बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. "कसबा बावडा येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा केला असून, तेथे प्रक्रिया होत' असल्याचे सांगितले. या वेळी कदम यांनी "पूर्ण क्षमेतेने हा प्रकल्प सुरू ठेवा,' असे सांगितले. तसेच रमणमळा आणि बापट कॅंप येथे पंपिंग स्टेशन सुरू करून तेथील पाणी एसटीपीकडे वळवा, असे सांगितले. बैठकीला आयुक्त डॉ. चौधरी यांच्यासह, इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

पंचवीस टक्के निधी खर्च करा : कदम 
पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले, ""पर्यावरणाचे रक्षण करणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे महापालिकांनी त्यांच्या अंदाजपत्रकात 25 टक्के निधी हा पर्यावरण कामावर खर्च करावा.'' त्यावर आयुक्त डॉ. चौधरी म्हणाले, ""कोल्हापूर महापालिकेने 25 टक्के निधीची तरतूद केली आहे.'' त्यावर कदम म्हणाले, ""केवळ तरतूदच करू नका, तर हा निधी अशा प्रकारच्याच कामावर कसा खर्च होईल याकडेही कटाक्षाने लक्ष द्या. अमृत योजनेतूनही आता दुधाळी नाल्यावरील एसटीपीचे काम सुरू आहे. डिसेंबरअखेरपर्यंत या कामात प्रगती करा.'' 

Web Title: kolhapur news ramdas kadam Panchganga River