राष्ट्रपती मुखर्जींकडून भूषणावह कामगिरी  - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

कोल्हापूर - भारताच्या सार्वभौमत्वाला आणि लोकशाहीला भूषणावह कामगिरी करून मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतिपदाला पूर्ण न्याय दिला आहे, असे गौरवोद्‌गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी काढले. येथील खासदार धनंजय महाडिक यांच्यासह "राष्ट्रवादी'चे सर्व खासदार आणि वरिष्ठ नेत्यांनी नवी दिल्ली येथे मावळते राष्ट्रपती श्री. मुखर्जी यांची भेट घेतली. या वेळी श्री. मुखर्जी यांनीही श्री. पवार यांच्या प्रदीर्घ संसदीय कारकीर्दीचे कौतुक केले. 

या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, तारिक अन्वर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, छत्रपती उदयनराजे भोसले, वंदना चव्हाण, माजिद मेमन, फैजल उपस्थित होते. 

Web Title: kolhapur news sharad pawar Pranab Mukherjee