Video Viral: जामिनावर सुटलेल्या गुंडाची जंगी मिरवणूक; पोलिसांना थांगपत्ता नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur viral video

Video Viral: जामिनावर सुटलेल्या गुंडाची जंगी मिरवणूक; पोलिसांना थांगपत्ता नाही

कोल्हापूरः जामिनावर गुंड बाहेर येतात तेव्हा त्यांची मिरवणूक काढल्याचे प्रकार यापूर्वीही घडलेले आहेत. अशा घटना वरचेवर वाढतच आहेत. काल रात्री पुन्हा एका गुंडाची मिरवणूक काढल्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

कोल्हापूर येथे काल रात्री गुंडाची मिरवणूक निघाली. अजित नाईक हा खून आणि खंडणीच्या गुन्ह्यात जेलमध्ये होता. काल तो जामिनावर सुटताच त्याची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये काही गाड्या आणि चेकाळलेले समर्थक दिसत आहेत.

हेही वाचाः गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित नाईक हा इचलकरंजी शहरातला गुंड आहे. तो येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्याची काल सुटका झाली. मात्र जो व्हीडिओ व्हायरल होतोय तो कोल्हापूर शहरातला नसून महामार्गावरचा आहे. कोल्हापूरमध्ये येण्यास या गुंडाला बंदी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र अशा प्रकारे गुंडाची मिरवणूक निघाल्याने परिसरामध्ये दहशतीचं वावातरण निर्माण झालं आहे. 'एबीपी माझा'ने याबाबचे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: Navale Bridge Accident: ब्रेक फेल नव्हे, ड्रायव्हरची मस्ती नडली; नवले ब्रिज अपघाताचं कारण आलं समोर

टॅग्स :Kolhapurcrime