रायगडावर ताक विकणाऱ्या कोमलला मिळणार पाठबळ, दोन तरुणांनी घेतली जबाबदारी

Komal Shinde a girl selling buttermilk at Raigad will get financial help pune
Komal Shinde a girl selling buttermilk at Raigad will get financial help pune
Updated on

पुणे : हातावर पोट भरणारे अनेक कुटुंबे राज्यातील कानाकोपऱ्यात पाहायला मिळतात, घरची परिस्थिती हालाकिची असल्याने अनेक मुलांना त्यांचं शिक्षणदेखील पूर्ण करता येत नाही. कमल शिंदे या रायगड किल्ल्यावर ताक विकून उदरनिर्वाह करणाऱ्या मुलीला दोन उच्चशिक्षित तरुणांकडून आर्थिक पाठबळ देण्यात येत आहे.

रायगडावरील ताक विकणारी मुलगी कमल शिंदे उद्या पुण्यात बोलवण्यात अले असून रोहन काळे आणि करण तावरे (करण म्हणजे युरोपातील फोब्जसच्या यादीत झळकलेल्या आर्याचा भाऊ) हे दोघे उच्चशिक्षित तरुण तिची शिक्षणाची जबाबदारी स्विकारत आहेत. उद्या त्यांच्याकडून कमलला सुरुवात म्हणून १ लाखाचा चेक देत आर्थिक पाठबळ देण्यात येणार आहे. कमलला 3 सख्या बहिणी आहेत आणि २ सख्खे भाऊ आहेत. हे सगळी मिळून ६ भावंडे आहेत. घरात आई-वडील आणि आज्जी आहे. हे कुटुंब गडावर येणाऱ्या पर्यटकांना पिठ्ठल भाकरी करून देऊन आपला उदनिर्वाह चालवते.

Komal Shinde a girl selling buttermilk at Raigad will get financial help pune
दहा दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करणार, आझाद यांनी केलं जाहीर

विराज तावरे यांना काही वर्षांपूर्वी कमल भेटली होती आणि आता शेवटी तिला उद्या मदत दिली जाणार आहे. या मदतीबद्दल विराज तावरे यांनी कमल विषयी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदवी स्वराज्याची राजधानी जिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.. जिथं महाराजांनी आपला देह ठेवला त्या किल्ले रायगडावरील महाराजांच्या समाधी शेजारी झोपडीत राहणारी छोटीसी कमल शिंदे... गडावरील जगदीश्वराच्या मंदिरात ती ताक विकते.... तिच्या घरची आर्थिक परिस्थिती खूप गरिबीची आहे. गरिबीमूळ शिक्षणात अडथळे येत आहेत, ती रोज गडावरून खाली शाळेत येते आणि परत गडावर जाते. संघर्ष हा पाचवीलाच पुजला आहे. मी गेली ८ वर्षे सतत तिच्या आणि घरच्यांच्या गावकऱ्यांच्या संपर्कात आहे. मला जमेल तशी २ हजार, ४ हजार, ५ हजार मदत मी करतो असतो परंतु ही मदत अत्यंत तोकडी असते, असे विराज तावरे यांनी सांगितले.

Komal Shinde a girl selling buttermilk at Raigad will get financial help pune
गोळीबार केल्याचा आरोपांवर सदा सरवणकरांची प्रतिक्रिया, म्हणाले..

तसेच तावरे यांनी सांगितलं की त्यांनी अनेकांशी तिच्या शिक्षणासाठी मदत करा म्हणून बोललो सर्वांनी करू करू म्हटले पण प्रत्यक्षात काही होताना दिसल नाही. पण रोहन काळे आणि करण तावरे या परदेशात शिक्षण झालेल्या उच्चशिक्षित तरुणांना जेव्हा मी पोटतिडकीने सांगितलं तर त्यांच्याही मनाला वेदना झाल्या. त्यांनी लगेच तिच्या उच्चशिक्षणासाठी आपण ठोस भरीव मदत देण्याचा छोटासा प्रयत्न आमच्यापरीने आम्ही करू म्हणून सांगितलं आणि नुसतं पोकळ आश्वासन दिल नाही तर सुरुवात म्हणून 1 लाख रुपयांचा चेक सुद्धा ते दोघे देत आहेत.

महिला बालिका सबलीकरण खऱ्या अर्थाने व्हावं आणि समाजात चांगला संदेश पोहचावा म्हणून गडप्रेमी महिला हवेलीच्या पहिल्या महिला तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या हस्ते मुलींच्या शिक्षणाची बीज ज्यांनी प्रचंड संघर्ष करून रोवली त्या सावित्रीबाई फुलेंच्या वाड्यात त्यांच्याच समोर हा निधी आम्ही उद्या सुपूर्द करत आहोत. उद्या रायगडावरील गावकरी कमल पुण्यात येत आहेत अशी माहिती विराज तावरे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com