esakal | कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना नसणार कोरोनाची 'ही' बंधने
sakal

बोलून बातमी शोधा

Konkan

कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना नसणार कोरोनाची 'ही' बंधने

sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई : गणरायाचे आगमन (Ganpati Festival) होण्यासाठी फक्त एका आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिल्याने मुंबई, पुणे, नागपूर येथील चाकरमान्यांना कोकणात (konkan Commuters) जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. यानिमित्त्याने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गाचे पालकमंत्री (Government Authorities) आणि प्रशासनानेमध्ये अंतर्गत बैठक घेऊन चाकरमान्यांना कोकणात जाण्यास मुभा दिली आहे. यामध्ये कोरोना लसीचे दोन डोस (corona Two Dose), आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र (RTPCR certificate) बंधनकारक नसेल. परंतु, कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांचे प्रमाणपत्र, 72 तास आधी आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र असल्यास कोणत्याही अडवणूकीविना, चाचणीविना (corona Test) चाकरमान्यांना रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत प्रवेश मिळणार आहे. तर, 18 वर्षाखालील तरूण, बालकांना कोकणात जाण्यास बिनशर्त मुभा दिली आहे.

हेही वाचा: ह्रदयविकाराचे प्रमाण दुपटीने वाढले; धुम्रपानाचा आरोग्यावर घातक परिणाम

गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. मागील वर्षी चाकरमान्यांना कोकणात जाता आले नाही. परिणामी, यंदा कोकणात जाण्यासाठी मागील दोन ते तीन महिन्यांपासून तयारी केली. रेल्वे, एसटीचे आरक्षण करण्यात आले होते. मात्र, ऎनवेळी चाकरमान्यांना कोरोनाचे दोन डोस, 72 तास आधी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली होती. त्यामुळे कोरोनाच्या निर्बंधामुळे चाकरमान्यांमध्ये राज्य सरकारविषयी असंतोष होता. कोकणवासियांनी या प्रकाराला विरोध दर्शविला. त्यानंतर पालकमंत्र्यांनी, जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचे लसीचे दोन डोस, आरटीपीसीआर चाचणीची बंधने हटविली आहेत. परंतु, कोरोनाचे नियम पाळणे गरजेचे आहे, असे परिपत्रक कोकणातील प्रत्येक जिल्ह्यांतून काढले आहे.

- ज्या चाकरमान्यांचे कोरोना लसीचे दोन डोस झाले असतील त्यांना कोकणात प्रवेश खुला असेल.

- 18 वर्षांखालील तरूण, बालकांना कोरोनाची लस नसल्याने त्यांना देखील कोकणात प्रवेश असेल.

- 72 तासांअगोदर आरटीपीसीआर चाचणी केलेले प्रमाणपत्र असल्यास या चाकरमान्यांना देखील कोकणात प्रवेश दिला जाईल.

- ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी केली नसल्यास जिल्ह्यांच्या सीमेवर त्वरीत कोरोना चाचणी केली जाईल. त्यानंतर अहवाल निगेटिव्ह आल्यास तत्काळ जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल.

- या कोरोना चाचणीत चाकरमान्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास, त्याला कोकणात प्रवेश करता येणार नसून संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले जाईल

बंधने नसले तरी, कोरोना नियमांचे पालन करा

- मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाचे सावट असल्याने कोकणात येणाऱ्या प्रत्येकाने कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. गर्दी होणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे.

- रेल्वे स्थानकात उतरल्यावर तीन ते चार रांगा करून प्रत्येकाला स्थानकाबाहेर जायचे आहे. यामध्ये एका रांगेत कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या चाकरमान्यांसाठी, दुसरी रांग 18 वर्षांखालील तरूण, बालकांसाठी, तिसऱ्या रांगेत आरटीपीसीआर चाचणी केलेल्यासाठी आणि चौथी रांग कोणतीही चाचणी किंवा कोरोनाचे डोस न घेतलेल्यांसाठी करण्यात येणार आहे.

loading image
go to top