esakal | ह्रदय विकाराचे प्रमाण दुपटीने वाढले; धुम्रपानाचा आरोग्यावर घातक परिणाम
sakal

बोलून बातमी शोधा

Heart-Attack

ह्रदयविकाराचे प्रमाण दुपटीने वाढले; धुम्रपानाचा आरोग्यावर घातक परिणाम

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla Death) यांचे वयाच्या 40 व्या वर्षी ह्रदय विकाराच्या (heart attack) झटक्याने निधन झाले.  पण  एवढ्या कमी वयात आलेल्या ह्रदय विकाराच्या झटक्यामुळे तरुणांमधील ह्रदय विकाराचे प्रमाण दुपटीने वाढले असल्याचे ह्रदय विकार तज्ज्ञ (heart experts) अधोरेखित करतात. बदललेल्या जीवनशैलीतून (lifestyle) 30 ते 40 वयोगटातील अनेक तरुणांना (youngsters) ह्रदय विकार असतात. पण, ते वेळीच लक्षात येऊन उपचार घेतले (treatment on time) तर त्यावर मात करता येते असेही तज्ज्ञ मंडळी सांगतात.

हेही वाचा: दहिसर जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये पुन्हा सापडला 10 फुटी अजगर!

दहा ते 15 वर्षात दुपटीने वाढ

पालिकेच्या केईएम रुग्णालयातील माजी विभागप्रमुख ह्रदय विकार तज्ज्ञ डाॅ. प्रफुल्ल केरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 ते 15 वर्षांच्या कालावधीत 30 ते 40 वयोगटादरम्यान किंवा त्याखालीलही वयोगटात ह्रदयाचा झटका येण्याचे प्रमाण वाढले आहे. भारतीयांमध्ये पाश्चिमात्य देशातील नागरिकांपेक्षा ह्रदयाचा झटका येण्याचा कालावधी हा 10 वर्षांआधीचा आहे. याचे सर्वात प्रमुख कारण धुम्रपान आहे. कारण, तरुण वयोगटामध्ये धूम्रपानाचे प्रमाण वाढले आहे. दुसरे कारण म्हणजे व्यायामाचा अभाव आणि बदललेली जीवनशैली. पुरेशा आहाराची कमतरता आणि व्यायाम केला तरी कोणाच्याही निदर्शनाखाली न करता जास्त व्यायाम करणे. यातून ही ह्रदयावर ताण पडतो.

40 वयोगटाखालील जे रुग्ण आहेत त्यांचा आम्ही अभ्यास केला असता असे आढळले आहे कि धूम्रपान हे प्रमुख कारण आहे. तसेच अंमली पदार्थ घेणाऱ्यांचे प्रमाण ही वाढलेले आहे.  फक्त सिनेसृष्टीतच नाही तर कित्येक तरुण तरुणी अंमली पदार्थांचे सेवन करताना दिसून येतात. हल्ली कोरोनामुळे जे आपण हृदयाचे ठोके तपासण्याचे यंत्र वापरतो त्यामध्ये जे तरुण तरुणी अंमली पदार्थ घेतात, धूम्रपान करतात किंवा दिवसभर खूप प्रमाणात कॉफीचे सेवन करतात,   त्यांच्यात हृदयाचे ठोके सामान्यापेक्षा जास्त दिसून येतात. त्यांचा पल्स रेट 100 च्या वर दिसून येतो, असेही डाॅ. केरकर यांनी सांगितले. 

हेही वाचा: भाजपचा प्रभाग कार्यालयांवर मोर्चा; महापालिका निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले

शरीरयष्टी बनवण्यासाठी अतिरिक्त स्टेरॉईडचा वापर आणि कोकेन या सर्व गोष्टींमुळे कमी वयात हृदयाचा झटका येऊ शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती, झोपेच्या आणि खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा हे सुद्धा हृदयविकाराचा झटका येण्यामागील मुख्य कारण ठरतेय. याशिवाय पोस्ट कोविड रूग्णांमध्ये शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्यानेही हृदयावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच हृदयाचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी जीवनशैलीत योग्य तो बदल करणं गरजेचं आहे असे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अमित पाटील यांनी सांगितले.

यासाठी नियमित किमान 30 मिनिटे व्यायाम करावा, पौष्टिक आहारचे सेवन करावेत, जंकफुडचं सेवन करणे शक्यतो टाळावेत, हृदयाचे कार्य व्यवस्थित सुरू आहे की हे तपासून पाहण्यासाठी ईसीजी, हृदयाची सोनोग्राफी या चाचण्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे चाळीशीनंतर प्रत्येकाने वेळोवेळी ही चाचणी करू घेणं आवश्यक आहे.

loading image
go to top