Vande Bharat: कोकणातल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! वंदे भारत डब्यांची संख्या दुप्पट होणार

Vande Bharat Coach Increse: वंदे भारत डब्यांची संख्या दुप्पट होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने ट्रेनच्या डब्यांची संख्या १६ किंवा २० डब्यांची करण्याची मागणी केली आहे.
Vande Bharat Coach Increase

Vande Bharat Coach Increase

ESakal

Updated on

खेड : कोकण मार्गावरून धावणाऱ्या मुंबई (सीएसएमटी) मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. मात्र, सध्या ही सुपरफास्ट ट्रेन अवघ्या आठ डब्यांसह धावत असल्याने प्रवाशांना तिकिटांसाठी मोठ्या प्रतीक्षा यादीचा (वेटिंग लिस्ट) सामना करावा लागत आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि गैरसोय लक्षात घेता या ट्रेनला आणखी आठ डबे जोडून ती १६ किंवा २० डब्यांची करावी, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com