
कोकण रेल्वेनं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या रोरो सेवेचा फज्जा उडाला आहे. आठवड्याभरापूर्वी या योजनेसाठी नोंदणी सुरू करण्यात आलीय. रायगडच्या कोलाडपासून गोव्यातील वेरणा पर्यंत रेल्वे कारसेवा असणार आहे. २३ ऑगस्टला नोंदणी सुरू झाली असून आठवड्याभरात फक्त एकच नोंदणी झाली आहे. एका बाजूला गाड्यांचा वेग कमी, सणासुदीला असलेली गर्दी, तिकिटं मिळत नसल्यानं कोकणमधील प्रवाशांची नाराजी असताना दुसरीकडे अशा रोरो सेवेची गरज काय असा प्रश्नही विचारला जात आहे.