कोकणाला पुन्हा पावसाचा तडाखा बसणार; मध्य महाराष्ट्रातही जोर वाढणार

nashik rain
nashik rainesakal

पुणे : राज्यात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील पुराचे पाणीही हळूहळू ओसरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान पुढील काही दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात मंगळवारी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी पडल्या. कोकण आणि विदर्भातील बऱ्याच ठिकाणी पावसाची नोंद झाली. सध्या बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तसेच दक्षिण उत्तर प्रदेशच्या भागावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या सर्व कारणांमुळे राज्यात पुढील तीन दिवस कोकण, घाट माथ्यावर आणि मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. पुणे, सातारा, कोल्हापुरात कमी झालेल्या पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे. पुढील चार दिवस पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे येथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने नमूद केली आहे.

nashik rain
तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी राज ठाकरे पुण्यात दाखल

पुणे शहर परिसरात मंगळवारी पावसाचा जोर कमीच होता. कमी जास्त प्रमाणात राहू राहून पावसाने शहरासह उपनगरात हजेरी लावली होती. ढगाळ वातावरणाचे सावटही अधूनमधून होत होते. शहरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १.२ मिलिमीटर, तर लोहगाव येथे ३.४ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली.

मागील काही दिवसांपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. मंगळवारी सकाळपासूनच पाऊस कमी होता. मात्र सायंकाळी नऊ वाजेपर्यंतच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी पडल्या. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र येत्या ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यातील घाट परिसरात जोरदार ते मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com