शरद पवारांना तिसरं समन्स, आज नोंदवणार साक्ष | Sharad Pawar on Koregaon Bhima Violence | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar on Koregaon Bhima Violence

Koregaon Bhima Violence : शरद पवारांना तिसरं समन्स, आज नोंदवणार साक्ष

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी (Koregaon Bhima Violence) आज साक्ष नोंदवणार असल्याची माहिती मिळतेय. याप्रकरणी त्यांना तिसरं समन्स प्राप्त झालं असून आज मुंबईत सुनावणी होणार आहे. त्यासाठी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पवार आयोगासमोर साक्ष नोंदवण्यासाठी हजर राहणार असल्याचं कळतंय. (Sharad Pawar on Koregaon Bhima Violence)

हेही वाचा: भीमा-कोरेगाव दंगल झाल्याप्रकरणी भिडे यांच्या विरोधात कुठलाही पुरावा सापडला नाही

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात देखील पवारांना समन्स बजावण्यात आले होते. त्याआधी देखील एक समन्स बजावण्यात आले. पण, पवार वैयक्तिक कारणांमुळे साक्ष नोंदविण्यासाठी जे. एन. पटेल यांच्या आयोगासमोर हजर राहू शकले नाही. आता त्यांना तिसरं समन्य बजावण्यात आलं असून त्यानुसार आज पवार आयोगासमोर साक्ष नोंदविण्यासाठी हजर राहणार असल्याची माहिती मिळतेय.

पवारांनी प्रतिज्ञापत्रातून काय म्हटलं? -

शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. यामध्ये वापरलेल्या कलमांवर पवारांनी आक्षेप घेतला होता. ब्रिटीशकालीन कायद्यातील आयपीसी कलम 124 (अ) चा पुनर्विचार व्हायला हवा. राजद्रोहाच्या कलमाचा वापर इंग्रजांच्या काळात सरकारविरोधात बोलणाऱ्या लोकांवर व्हायचा. आता त्याचा गैरवापर दिवसेंदिवस वाढतोय. मुळात देशहितासाठी आयपीसी आणि युएपीए कायद्यातील अन्य तरतूदी असताना 124(अ) या कलमाची गरज आहे का? याचा विचार करायला हवा, असं पवार आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हणाले होते.

नेमकं काय आहे प्रकरण? -

देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. इथं लाखो लोकांची गर्दी असते. गेल्या २०१८ मध्ये याठिकाणी हिंसाचार झाला होता. त्याचे पडसाद राज्यभरात देखील उमटले होते. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एक आयोग नेमला आहे. सध्या हा आयोग या प्रकरणाची चौकशी करत आहे.

पवारांची साक्ष का? -

कोरेगाव भीमाच्या हिंसाचाराला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे जबाबदार असून त्यांनी तिथलं वातावरण बिघडवलं होतं आणि वस्तूस्थिती व पुणे पोलिसांचा तपास यामध्ये विरोधाभास असल्याचं वक्तव्य पवारांनी माध्यमांसमोर केलं होते. त्यानंतर आयोगाने पवारांचीही साक्ष नोंदवावी, अशी मागणी विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी आयोगाकडे केला होता. पण, पवारांनी यापूर्वी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोरेगाव भीमा हिंसाचार कोणामुळे घडले? याबाबत मला माहिती नाही. तसेच यामध्ये राजकीय हेतू होता, असे कोणतेही आरोप करायचे नाही, असं म्हटलं आहे.

Web Title: Koregaon Bhima Violence Sharad Pawar Will Present Before Inquiry Commission

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top