महापुराच्या भीतीने कोयनेचा वीजनिर्मीती प्रकल्प बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

- चिपळुणात महापुराची भीती; 
- संपूर्ण शहर जलमय 

चिपळूण ः महापुराच्या भीतीने कोयनेचा वीजनिर्मीती प्रकल्प बंद करण्यात आला असून चिपळुणमध्ये महापुराची भीती निर्माण झाली आहे. सध्या संपूर्ण शहर जलमय झाल्याचे चित्र आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह चिपळूण तालुका आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या भागात पुन्हा महापुराची भीती व्यक्त होत आहे. चिपळूणमध्ये पाणी घुसले असून, संपूर्ण शहर जलमय झाले आहे. 

चिपळूणमधील पुरस्थिती विचारात घेऊन प्रशासनाने कोयना जलविद्युत प्रकल्पाचा 1,956 मेगावॅट क्षमतेचा पश्‍चिमेकडील वीजनिर्मिती प्रकल्प बंद करण्याचे आदेश महानिर्मिती कंपनीला दिले आहेत. या आदेशानंतर संबंधित प्रकल्प बंद करण्यात आल्याचे "महानिर्मिती'चे मुख्य अभियंता राजेश मोराळे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Koyna power plant closed due to fear of floods