Mumbai Best Bus Accident : कुर्ल्यातील आंबेडकरनगर येथे बेस्ट बसचा अपघात झाला आहे. यावेळी बसने अनेक गाड्यांना धडक दिली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच ३१ जण जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णाल्यात उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.