Haribhau Naik : माजी मंत्री, ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचं निधन

Labor leader Haribhau Naik passes away
Labor leader Haribhau Naik passes away esakal
Summary

कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा नेता गमावल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.

नागपूर : ज्येष्ठ कामगार नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री हरिभाऊ नाईक (Haribhau Naik) यांचं वृद्धापकाळानं निधन झालंय. ते ९४ वर्षांचे होते. माजी राज्यमंत्री नाईक यांनी मध्यरात्री 1 वाजता आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलाय. कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा नेता गमावल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.

माजी कामगार राज्यमंत्री राहिलेल्या हरिभाऊ नाईक यांनी नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) महापौरपदासह महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष, ILO जागतिक श्रम संघटनेचे भारताचे कामगार प्रतिनिधी, राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूर आणि मुंबईचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय.

Labor leader Haribhau Naik passes away
'टार्गेट किलिंग'चं सत्र सुरुच; 2 वर्षांत पंडितांसह 3 हजार हिंदूंनी सोडलं काश्मीर

हरिभाऊ नाईक यांच्यावर आज सायंकाळी 4 वाजता मोक्षधाम, घाट रोड नागपूर इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com