
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत राज्यातील अडीच कोटी बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळत आहेत . मात्र पैशाच्या गुंतवणुकी बद्दलबहुतांश लाडक्या बहिणींना याची माहिती नाही, त्यामुळे या मिळणाऱ्या पैशाचे नियोजन कसे करायचे याचे धडे आता सरकारच्या वतीने दिले जाणार आहेत.