

Ladki Bahin Yojana News Update
esakal
Ladki Bahin Yojana
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत काटेकोरपणे पारदर्शकता आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले असून, ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे.
ई-केवायसीचा संपूर्ण डेटा आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. डिजिटल पडताळणी पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांचे तसेच त्यांच्या पती किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न आणि इतर कागदपत्रे तपासली जाणार आहेत. ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, त्या यापुढे अपात्र ठरतील आणि त्यांचा दरमहा १,५०० रुपयांचा हप्ता कायमचा बंद होईल.