

Ladki Bahin Scheme
esakal
अकोला : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती-जमातींच्या विकासासाठी राखीव असलेला तब्बल १४ हजार ६०१.१३ कोटी रुपयांचा निधी वळविण्यात आल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी केला आहे. हा निधी तातडीने संबंधित विभागांकडे परत वर्ग करावा, अशी मागणी त्यांनी केली असून, अन्यथा अनुसूचित जाती-जमातींच्या वतीने सामाजिक न्याय व आदिवासी विकास मंत्र्यांच्या निवासस्थानांवर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.