
महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबातील निर्णायक भूमिका वाढवण्यासाठी महायुती सरकारने 29 जून 2024 रोजी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" सुरू केली. या योजनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या योजनेने लाखो महिलांना आर्थिक आधार दिला असून, त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. दरमहा 1,500 रुपये थेट बँक खात्यात जमा होत असल्याने अनेक महिलांनी आपल्या मुलांचे शिक्षण, छोटे व्यवसाय आणि आर्थिक स्थैर्य मिळवले आहे. मात्र, जून 2025 चा हप्ता अद्याप जमा न झाल्याने महिलांमध्ये उत्सुकता आणि संभ्रम आहे.