Maharashtra Government Scheme: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना लागू केली होती. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना महिन्याला दीड हजार रुपये देण्याची तरतूद आहे. सुरुवातीला योजनेच्या निकषांकडे दुर्लक्ष करुन सरकारने सरसकट लाभ दिला. मात्र निवडणुकांनंतर निकषांची अंमलबजावणी कठोरपणे करण्यास सुरुवात झाली आहे.