
लाडकी बहीण योजना आता डोकेदुखी ठरत असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने आता लाडक्या बहिणींना E-KYC अनिवार्य केली आहे. E-KYC करताना अनेक अडचणी देखील येत आहेत. आधार क्रमांक टाकल्यावर ओटीपी येत नाही. ओटीपी आला तर उशिरा येतो. मोबाईलमध्ये ओटीपी टाकण्यासाठी पर्यायदेखील दिसत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरली आहे. हिंगोलीतील अनेक गावांतील शेकडो महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात जाब विचारण्यासाठी आल्या आहेत.