

eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar
esakal
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ पुन्हा चर्चेचे केंद्रबिंदू ठरली आहे. ही योजना सुरू करणाऱ्या महायुतीत आता या योजनेच्या श्रेयासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये ही योजना आपलीच असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणींपुढे आता मोठा पेच निर्माण झाला आहे, मत कोणाला द्यायचे? ‘देवा भाऊ’, ‘एकनाथ भाई’ की ‘अजित दादा’?