Minister Aditi Tatkare's Statement : राज्य सरकारद्वारे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. या पडताळणीत आतापर्यंत ५ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे या अपात्र महिलांचे पुढं काय होणार? या महिलांवर कारवाई होणार? की या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार? याची चर्चा महिलांसमध्ये सुरु आहे. दरम्यान, यासंदर्भात आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.