

Ladki Bahin Yojana update
esakal
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यभर राबवली आहे. या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. यासाठी सर्व लाभार्थ्यांनी १८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत e-KYC पूर्ण करणे बंधनकारक होते.