

Ladki Bahin Yojana
esakal
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेने विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. बिहारमध्येही 'लाडकी बहीण' फॅक्टर निवडणुकीत निर्णायक ठरला. आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना, सरकार या योजनेबाबत दोन मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १,५०० रुपये जमा केले जातात. मात्र, काहींनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याने सरकारने ई-केवायसी बंधनकारक केले आहे.