
Ladki Bahin Yojana e-KYC
esakal
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाखो महिलांना दरमहा १,५०० रुपये मिळत आहेत. मात्र अनेकजण या योजनेचा लाभ चुकीच्या पद्धीतने घेत असल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे सरकारने आता योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC अनिवार्य केलं आहे. मात्र e-KYC करताना प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी पसरली. आधार क्रमांक टाकल्यानंतर OTP न येणे, साइटवर लोड येणे यासारख्या समस्यांनी अनेकांना त्रास सहन करावा लागत आहेत. पण आता यावर उपाय समोर आला आहे, ज्यामुळे e-KYC प्रक्रिया सुलभ होणार आहे.