

Ladki Bahin Yojana February Update: ₹4,500 Lump Sum or ₹1,500 Monthly — Who Gets What?
esakal
महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक सुखद बातमी मिळाली आहे. राज्य सरकारने या योजनेअंतर्गत थकित असलेल्या तीन महिन्यांच्या हप्त्यांचा एकत्रित लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली असून, या निर्णयामुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः ई-केवायसी प्रक्रियेमुळे हप्ते रखडलेल्या लाभार्थींना याचा मोठा फायदा होईल.