
Ladki Bahin Yojana
esakal
लाडकी बहीण योजना आता E-KYC च्या जाळ्यात अडकली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी देखील निकष डावलून या योजनेचा लाभ घेतला. निवडणुकीचा काळ असल्याने सरकारने त्यावेळी योग्य पडताळणी केली नाही. त्यामुळे सरकारला मोठा आर्थिक फटका बसला. मात्र आता आर्थिक झळ जाणवल्याने, E-KYC केल्यानंतरच १५०० रुपये महिना मिळणार आहे. मात्र E-KYC साठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे तोपर्यंत पैसे मिळणार नाहीत का? दिवाळीच्या हप्त्याचं काय होणार, असा प्रश्न राज्यातील महिलांना पडला आहे.