
लाडकी बहीण योजनेचा जुलै-ऑगस्टचा एकत्रित 3000 हप्ता रक्षाबंधनाच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे.
ज्या महिलांचा वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा सरकारी नोकरीत आहेत, त्यांना हप्ता मिळणार नाही.
सरकारने योजनेचा हप्ता 2100 करण्याचे वचन दिले असले तरी, सध्या 1500 प्रतीमहिना दिला जात आहे.
महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक वरदान ठरली आहे. ही योजना 2024 मध्ये सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक आधार देत आहे. सध्या जुलै 2025 चा हप्ता कधी मिळणार आणि जुलै-ऑगस्टचे हप्ते एकत्र (म्हणजेच 3000 रुपये) मिळणार का, याबाबत चर्चा जोरात आहे. विशेषतः 9 ऑगस्ट 2025 रोजी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे.