
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. मात्र, जून २०२५ चा हप्ता अद्याप जमा न झाल्याने महिलांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. जून महिना संपण्यास आता फक्त तीन दिवस शिल्लक असताना, जून आणि जुलैचे हप्ते एकत्र जमा होण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने संभ्रम वाढत आहे.