
महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरलेली लाडकी बहिण योजनेची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. महिलांच्या खात्यावर सातवा हप्ता जमा झाला असला तरी 2100 रुपयांचा हप्ता केव्हापासून मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच लाडकी बहिण योजनेच्या निकषांची चर्चा सुरु झाली आहे. या योजनेचे निकष बदलणार अशी चर्चा सुरु असते. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत भाष्य केले आहे.