
महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी सर्व संबंधित विभागांना याबाबत निर्देश जारी केले. योजनेचा नियमबाह्य लाभ घेणाऱ्या ९,५२६ सरकारी महिला कर्मचाऱ्यांचा डाटा महिला व बालकल्याण विभागाकडे तयार आहे. यामुळे योजनेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सरकारने याबाबत कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.