Ladki Bahin Yojana October Installment Date 2025
esakal
when will October installment of Ladki Bahin Yojana come: गेल्या वर्षी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये देणार असल्याचं सरकारने जाहीर केलं होतं. विधानसभा निवडणुकीपर्यंत महिलांना या योजनेचा हप्ताही नियमित मिळतही होता. मात्र आता निवडणुकीनंतर हा हप्ता मिळण्यात उशीर होतो आहे. सप्टेंबरचा हप्ता महिलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मिळाला आहे. मात्र, आता महिला ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट बघत आहेत.