Laadki Bahin Yojana October Installment Update
esakal
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला आहे. मात्र, आता महिलांना ऑक्टोबरच्या हप्ताची प्रतिक्षा आहे. अशातच उद्या भाऊबीज सण आहे. त्यामुळे भाऊबीजच्या मुहूर्तावर महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळेल का? अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण यापूर्वी अनेकदा सणीसुदीच्या मुहूर्तावर सरकारने महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरीत केले आहे. याबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.