
महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणीत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. नागपूर जिल्ह्यात तब्बल 61,146 अपात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं सर्वेक्षणात समोर आलं आहे. विशेष म्हणजे यामध्ये काही पुरुष आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तींचाही समावेश आहे. प्रशासनाने कठोर पावलं उचलत या अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून हद्दपार केलं आहे. या घडामोडींमुळे योजनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.