

Ladki Bahin Yojana
esakal
महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. नोव्हेंबर महिना संपण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असताना, या महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोरात सुरू असून, आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे अनुदान एकत्रितपणे जमा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात एकदम तीन हजार रुपये जमा होऊ शकतात.