Maharashtra Government Scheme : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त (Ladki Bahin Yojana) मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. राज्यातील तब्बल २६ लाख लाभार्थी पात्रतेच्या निकषात बसत नाहीत, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. यानंतर सरकारने या लाभार्थ्यांची कागदपत्रे सूक्ष्मपणे तपासण्याचे काम सुरू केले असून, बोगस प्रकरणे आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी (Aditi Tatkare) समाजमाध्यम ‘एक्स’वरून कळवले.