marathi
marathi

यंदा महिला होणार संमेलनाध्यक्ष

लातूर : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यापासून कवीवर्य ना. धों. महानोर यांच्यापर्यंत वेगवेगळी नावे पुढे येत असली तरी संमेलनाध्यक्षपदाचा पहिला सन्मान महिलेलाच मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ज्येष्ठ लेखिका प्रभा गणोरकर आणि कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची नावे साहित्य महामंडळाकडे आली आहे. यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया बंद करून साहित्य महामंडळ यंदापासून संमेलनाध्यक्षाची सन्मानाने निवड करणार आहे. तसा बदल महामंडळाने आपल्या घटनेत केला आहे. त्यानूसार महामंडळाने संलग्न, समाविष्ट असलेल्या सर्व साहित्य संस्थांना अध्यक्षपदासाठी नावे सूचवा, असे पत्र पाठवले होते. त्यानूसार त्या-त्या साहित्य संस्थांनी अध्यक्षपदासाठी नावे सुचवली आहेत. त्यात नेमाडे, महानोर, गणोरकर, ढेरे यांच्यासह नाटककार प्रेमानंद गज्वी, रा. रं. बोराडे, सुधीर रसाळ या नावांचा समावेश आहे, अशी चर्चा आहे. महामंडळाने ही नावे अद्याप गाेपनिय ठेवली आहेत.  

नेमाडे यांनी यापूर्वी साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग आहे, अशा शब्दांत संमेलनावर टीका केली होती. त्यामुळे ते संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारणार नाहीत, अशी चर्चा आत्तापासूनच साहित्य वर्तूळात रंगू लागली आहे. महानोर यांनीही अध्यक्षपदासाठी सुचविण्यात आलेल्या इतर साहित्यिकांचा अपमान होईल, असे कारण पुढे केले आहे. त्यामुळे तेही अध्यक्षपद स्वीकारणार नाहीत, असे स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे मराठवाडा साहित्य परिषदेने घटनादुरूस्तीच अपूर्ण आहे, असे कारण सांगून अध्यक्षपदासाठी पाठवलेली नावे मागे घेतली आहेत. या निवड प्रक्रियेत यंदा तठस्थ राहण्याचा निर्णयही मराठवाडा साहित्य परिषदेने घेतला आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी गणोरकर आणि डॉ. ढेरे यांच्याच नावाचा विचार प्रामुख्याने होईल, अशी शक्यता आहे. तशी चर्चाही आता साहित्य वर्तूळात रंगू लागली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com