Sharad Pawar: भू विकास बँकेची कर्जमाफी फसवी! शरद पवारांनी थेट मांडला हिशोब

कर्जमाफीवरुन पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका
ncp Sharad pawar
ncp Sharad pawarsakal media
Summary

कर्जमाफीवरुन पवारांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारनं नुकतीच भ-विकास बँकेची कर्जमाफी योजना जाहीर केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. पण ही कर्जमाफी साफ फसवी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच जाहीर कार्यक्रमात ही कर्जमाफी कशी फसवी आहे? हे दाखवून दिलं. (Land development bank loan waiver fraudulent Sharad Pawar accuses Shinde Fadnavis govt)

ncp Sharad pawar
Diwali Gifts: १ लाख रोख, सोनं-चांदीचं वाटप आणि...; मंत्र्याकडून नगरसेवकांना 'तगडं' दिवाळं गिफ्ट

पवार म्हणाले, गेल्या दहा वर्षात एका तरी शेतकऱ्याला भू विकास बँकेकडून कर्ज मिळालं आहे का? ही राज्यात अस्तित्वात आहे का? एकेकाळी ही बँक होती पण आता ती राज्यात कार्यरत नाही. गेल्या ३० वर्षात भू विकास बँकेच्या कर्जांची वसूली होऊ शकलेली नाही आणि होऊ शकणारही नाही, हे ध्यानात आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं या बँकेतील शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याचा निर्णय घेतला. एकूणच आम्ही खूप काही कर्जे माफ केल्याचं सरकारकडून दाखवलं जात आहे.

९६४ कोटींची कर्जमाफी

राज्यातील भू-विकास बँकेतील शेतकऱ्यांचे ९६४ कोटी रुपयांचे थकीत कर्ज माफ करण्याचा नुकताच घेतला होता. या कर्जमाफीमुळं ३५ हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचा दावाही शिंदे-फडणवीस सरकारनं केला आहे. सहकारी कृषी ग्रामीण बहुद्देशीय विकास बँक अर्थात भूविकास बँकेची स्थापनी शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीची कर्जे देण्यासाठी करण्यात आली होती. १९९८ पासून कर्ज वितरण बंद झाल्यानं ही बँक अडचणीत आली. त्यानंतर सन २००२ मध्ये ही बँक दिवाळखोर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. त्यानंतर २००८मध्ये या बँकेचं पुन्हा पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तरीही ही बँक तग धरु शकली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com