'पंतजली उद्योगसमूहाला सरकारने जमीन दिलेली नाही' 

'पंतजली उद्योगसमूहाला सरकारने जमीन दिलेली नाही' 

मुंबई : राज्य शासनाने आज (ता.16) एक मोठा खुलासा केला असून पतंजली उद्योग समूहाला औसा येथील जमीन दिलेली नाही असे सांगितले आहे. राज्यात येणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला ज्या सुविधा व सवलती देऊ केल्या जातात, त्याच पतंजली उद्योग समूहाला देण्याचे प्रस्तावित करण्यात आले असल्याचेही राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

प्रचलित नियमाबाहेरची एकही सवलत राज्य सरकारकडून देऊ करण्यात आलेली नाही. त्यामुळे पतंजली उद्योग समूहाला औसा, जि. लातूर येथील जमीन चार दिवसांत देण्यात आली या बातमीत काहीही तथ्य नाही. तसेच पतंजली उद्योग समूहाला अद्याप जमीन देण्यात आलेली नाही, असा खुलासा राज्य शासनाने केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com