दिवंगत ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार  जाहीर  

ratnakar matkari
ratnakar matkari

मुंबई: दिवंगत ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांना यंदाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. रुपये पाच लक्ष, , मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.  

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीनरत्नाकर मतकरी यांच्या रंगभूमीवरील बहुमूल्य योगदानाचा गौरव, 2019-20 या वर्षासाठीच्या नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्काराने करण्यासाठी  शिफारस  केली होती, परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू झाल्याने पुरस्काराची घोषणा आणि प्रदान समारंभ होण्यापूर्वीच रत्नाकर मतकरी यांचे आकस्मिक निधन झाले.

 त्यामुळे  2019-20 या वर्षाचा   नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार दिवंगत ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी यांना मरणोत्तर घोषित करण्यात आला आहे.

रत्नाकर मतकरी यांनी नाटक, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कांदबरी, ललित लेख, वैचारिक साहित्य अशा सर्व साहित्य प्रकारांत दर्जेदार आणि सातत्यपूर्ण लेखन  केले. साहित्यिक, रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रकार म्हणूनही त्यांनी मोलाचे योगदान आहे. 

त्यांनी महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहुर्तमेढ रोवून, सुमारे तीस वर्षे पदरमोड करुन बालनाट्यांची निर्मिती केली.  मतकरी यांच्या कार्याचा गौरव अनेक पुरस्कार आणि सन्मान देऊन करण्यात आला आहे. संगीत नाटक अकादमी आणि साहित्य अकादमी या दोन्ही संस्थांनी पुरस्काराने सन्मानित करून  त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

late ratnakar matkari got life time achievement award 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com