esakal | कौतुकास्पद! कोरोना योद्धे 'या' कामातही अग्रेसर; कोरोनाला हरवून दुसऱ्यांना देतायत जीवनदान..  
sakal

बोलून बातमी शोधा

plasma

आधी स्वतः कोरोनाच्या विळख्यात आले त्यानंतर त्याला हरवून दुसऱ्यांचा जीव वाचावा म्हणून पुन्हा ऑनड्युटी रुजू झालेल्या डाॅक्टरांनी प्लाझ्मा दान करण्यात ही पुढाकार घेतला आहे.

कौतुकास्पद! कोरोना योद्धे 'या' कामातही अग्रेसर; कोरोनाला हरवून दुसऱ्यांना देतायत जीवनदान..  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा, सकाळवृत्तसेवा

मुंबई: आधी स्वतः कोरोनाच्या विळख्यात आले त्यानंतर त्याला हरवून दुसऱ्यांचा जीव वाचावा म्हणून पुन्हा ऑनड्युटी रुजू झालेल्या डाॅक्टरांनी प्लाझ्मा दान करण्यात ही पुढाकार घेतला आहे. पालिकेच्या केईएम रुग्णालयातील डाॅक्टरांनी कोरोनावर मात करत प्लाझ्मा दान केल्यानंतर आता खासगी रुग्णालयांनीही यात सकारात्मक दिला आहे. 

कोरोनाच्या विळख्यात आलेले मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयातील 14 कर्मचार्यांनी आतापर्यंत प्लाझ्मा थेरेपीसाठी दान केला आहे. आतापर्यंत या रुग्णालयातील 86 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात ही एक दिलासादायक बाब म्हणजे कोणाचा ही मृत्यू झालेला नाही. 

हेही वाचा: वाघ आणि बिबट्यांनाही लॉकडाऊनचा फटका; मांसाहारी प्राण्यांच्या नशिबी फ्रोजन मटण..

वोक्हार्ट रुग्णालयातील परिचारिका क्लारा म्हणाल्या की, " एप्रिल महिन्यात तब्येत बिघडल्याने स्वाब चाचणी करण्यात आली होती. हा चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला होता. सुरूवातीला चिंता होती. पण या आजारातून बाहेर पडायचं असल्यास मानसिक दृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे. हे जाणून आजाराशी लढायचं ठरवलं आणि यातून सुखरूप बाहेर आले. पण तेव्हाच ठरवलं होतं की, बरं झाल्यावर प्लाझ्मादान करायचं. त्यानुसार प्लाझ्मा दान केलं आहे. "

"माझ्या रक्तातील प्लाझ्मा डोनट केल्यामुळे काही रुग्णांना याचा फायदा झाला आहे, याचा मला आनंद आहे. कोरोना पाँझिटिव्ह रुग्ण बरा झाल्यानंतर त्याच्या रक्तातील प्लाझ्मा दुसऱ्या कोरोना रुग्णासाठी अतिशय फायदेशीर आहे. यासाठी कोरोनातून सुखरूप बाहेर पडलेल्या रुग्णांनी स्वत:हून पुढाकार घेऊन अन्य रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्लाझ्मा डोनट करणे गरजेचे आहे", असे आवाहन परिचारिका क्लारा यांनी केले आहे.

पालिकेच्या रुग्णालयात वाढता प्रतिसाद-

पालिकेच्या केईएम रुग्णालयातही आतापर्यंत कोरोनापासून बरे झालेल्या 6 डोनर्सने पुढाकार घेत प्लाझ्मा दान केला आहे. या 6 डोनर्सपैकी 3 डोनर्स हे निवासी डॉक्टर्स आहेत जे कोरोनामुक्त झाले आहेत आणि ज्यांनी पुन्हा ड्युटी जॉईन केली आहे. तर, वाडिया रूग्णालयातील एका निवासी डॉक्टरानेही प्लाझ्मा दान केला आहे. तर , नायर रुग्णालयात कोरोनातून आतापर्यंत बरे होऊन घरी परतललेल्या 53 रुग्णांनी प्लाझ्मा दान केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

हेही वाचा: मोठी बातमी - तज्ज्ञ सांगतायत जुलै आणि ऑगस्टमध्ये कोरोना माजवणार हाहाकार,रुग्णसंख्या 'इतकी' वाढू शकते..

"रुग्णालयात आतापर्यंत 53 रुग्णांनी प्लाझ्मा दान केला आहे. नायर हे पूर्णपणे कोविड रुग्णालय झाल्याने सर्व कर्मचारी, डाॅक्टर्स उपचारात लागले आहेत. तरीही, चार निवासी डॉक्टर्स प्लाझ्मा दान करण्यासाठी गेले होते पण, ते दान करण्याच्या नियमावलीत बसले नाहीत. पण, आता आम्ही सर्वांना प्लाझ्मा दान करण्यासाठी आवाहन करत आहोत." असे नायर मार्डचे अध्यक्ष डाॅ. सतीश तांदळे यांनी म्हंटले आहे.  
doctors are donating their plasma who beats corona 

loading image
go to top