नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यानुसार, दहावीच्या परीक्षा पुढील वर्षी १६ फेब्रुवारीला सुरू होऊन नऊ मार्चला संपणार आहेत. तर, बारावीची परीक्षा १६ फेब्रुवारी ते नऊ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. दहावीसाठी एकूण ८३ विषय असून बारावीसाठी १२१ विषयांची परीक्षा या काळात होणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी १०१ दिवस आधी वेळापत्रक जाहीर केले असल्याचे सीबीएसई परीक्षांचे नियंत्रक सन्यम भारद्वाज यांनी सांगितले.