पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज १ सप्टेंबरपासून रिक्षांच्या भाड्यात वाढ लागू झाली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने या भाडेवाढीला मंजुरी दिली होती. नवीन दरानुसार रिक्षाचे किमान भाडे २५ रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले आहे.तसेच त्यापुढील प्रवासासाठी प्रति किलोमीटर १७ रुपयांऐवजी २० रुपये आकारले जाणार आहेत.