Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News Live Update : महाराष्ट्र, मुंबई, पुणे, राजकारण, हवामान, वाहतूक, क्रीडा आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणी अपडेट एका ठिकाणी जाणून घ्या.
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Updated on: 

Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी 

सांवर शहरात एक जुने आणि जीर्ण घराच्या शेजारील घराची भिंत त्यावर कोसळली. दुर्दैवाने, तिथे काम करणाऱ्या चार महिला मजुरांचा मृत्यू झाला, तर पाच जण (दोन पुरुष आणि तीन महिला) जखमी झाले. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. मृत चार महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सांवर रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. हे सर्वजण मजूर म्हणून काम करत होते. ज्या वास्तूचे काम सुरू होते ते एक जुने आणि मोडकळीस आलेले घर होते आणि गेल्या काही दिवसांपासून ते पाडण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असतानाच शेजारील घराची भिंत अचानक कोसळली आणि हे मजूर त्याखाली अडकले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com