नवी दिल्ली : दिल्ली-आग्रा महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत करण्यासाठी १,१२३.५६ कोटी रुपयांच्या रस्ते पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय पश्चिम दिल्लीत ३५९.६३ कोटी रुपयांचा स्वतंत्र रस्ता प्रकल्पही मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.