
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. २०२० मध्ये कोरोनाच्या महासाथीने जगात जनजीवन ठप्प झालं होतं. ७० लाखांपेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. दरम्यान, या कोरोनाकाळात माणुसकीला आणि डॉक्टरी पेशाला काळीमा फासणाऱ्या अनेक घटनाही घडल्या. अशीच एक घटना लातूरमध्ये घडल्याचं समोर आलंय. लातूरच्या दोन डॉक्टरांमधल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल होत अशून यामुळे खळबळ उडाली आहे. एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला कोरोना रुग्णाला मारून टाक असं सांगत असल्याचं यात ऐकू येतं.