सर्व गारपीटग्रस्तांना मदत देणार - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

लातूर - राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. दोन दिवसांत गारपीटग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण केले आहेत. येत्या तीन-चार दिवसांत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम पंचनाम्याचे अहवाल येतील. त्यानंतर आपद्‌ग्रस्त सर्व शेतकऱ्यांना शासनातर्फे मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे गुरुवारी दिली.

बीड येथे एका कार्यक्रमाला जाण्यासाठी फडणवीस यांचे आज येथील विमानतळावर आगमन झाले. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आदी उपस्थित होते. गारपीटग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.

Web Title: latur news maharashtra news hailstorm affected help chief minister