Law against Love Jihad in Maharashtra : आता महाराष्ट्रातही येणार 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा!

येत्या हिवाळी अधिवेशनात कायदा मंजूर करण्याचा असणार सरकारचा प्रयत्न
Giriraj Singh statement Love Jihad is new form of terrorism politics
Giriraj Singh statement Love Jihad is new form of terrorism politicsesakal

मुंबई : राज्यात लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं सांगत याविरोधात कायदा करण्याच्या हालचाली आता सरकारकडून सुरु झाल्या आहेत. त्यानुसार, राज्य विधीमंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. (Law aginst Love Jihad in Maharashtra might be sanction in Assembly winter session)

Giriraj Singh statement Love Jihad is new form of terrorism politics
MVA MPs meet Amit Shah: सीमावादावर तोडग्याचा मुहूर्त ठरला! मविआ-अमित शहांच्या भेटीत काय घडलं?

सध्या उत्तर प्रदेशात अशा प्रकारचे 'लव्ह जिहाद' विरोधात कायदा अस्तित्वात आहे. युपीतल्या या कायद्यातील तरतुदींनुसार, लग्नानंतर जबरदस्तीने धर्मांतर करणे, कोणाशीही खोटं बोलून विवाह करणे तसेच अशा विवाहाला सहाय्य करणं हे कायद्यानुसार गुन्हे आहेत.

हे ही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

यूपीच्या कायद्यात काय आहेत शिक्षेच्या तरतुदी?

यात दोषी असल्याचं सिद्ध झाल्यास आरोपीला 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. यामध्ये पीडित मुलगी जर 18 वर्षांपेक्षा लहान असेल किंवा अनुसूचित जाती वा जमातीची असेल तर चार ते सात वर्षांचा तुरुंगवास आणि कमीत कमी तीन लाख रुपयांच्या दंडाची तरतूद यामध्ये आहे. त्याचबरोबर कोणती संस्था किंवा संघटना या गुन्ह्यात सहभागी असेल तर त्याला तीन ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूदही आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com