महाराष्ट्रात मराठा-ओबीसी आरक्षण वादाचा मुद्दा वाढत चालला आहे. नुकतेच मराठा समाजाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना यश आले आहे. त्यांच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यांनी पुन्हा मनोज जरांगेंवर टीका केली आहे. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकरांचा त्यांना फोन आला होता. त्यावेळच्या संभाषणाची आता चर्चा होत आहे.