Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल; मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबतचे 'ते' वक्तव्य भोवले

OBC Leader controversy : मनोज जरांगे यांनी हाकेंच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे, ते म्हणाले की, आजवरच्या लढाईत आम्ही कधीही महिलांचा उल्लेख केला नव्हता. सर्व जाती-धर्माच्या महिलांचा आम्ही आदर करतो, पण लक्ष्मण हाकेंनी बोलून घाण केली.
OBC leader Laxman Hake faces FIR after his controversial statement on Maratha girls’ marriage, intensifying the Maratha-OBC reservation row.

OBC leader Laxman Hake faces FIR after his controversial statement on Maratha girls’ marriage, intensifying the Maratha-OBC reservation row.

esakal

Updated on

Summary

  1. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबत वादग्रस्त वक्तव्यामुळे गुन्हा दाखल झाला.

  2. बीडमधील सभेत हाकेंनी "मराठा मुलींची लग्ने ओबीसी मुलांशी लावा" असे मनोज जरांगे यांना आव्हान दिले होते.

  3. मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर देत महिलांचा मुद्दा लढाईत कधी आणला नाही व हाकेंचे वक्तव्य अयोग्य असल्याचे म्हटले.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबद्दल वक्तव करणे चांगलंच महागात पडले आहे. त्यांच्याविरोधात तलवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाकेंनी बीडच्या शृंगारवाडीतील सभेमध्ये मराठा समाजाबद्दल आणि मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होते. मराठा समाजातील मुलींचे लग्न आता ओबीसी मुलांसोबत लावा असे मनोज जरांगेंना आव्हान दिले होते. यानंतर मराठा समाज आक्रमक झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com