Laxman Jagtap passes away : जगताप यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, निष्ठावंत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Laxman Jagtap passes away : जगताप यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले, निष्ठावंत...

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. पुण्यातल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड होती. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. (Laxman Jagtap passes away news in marathi)

हेही वाचा: Laxman Jagtap Passes Away: शेतकरी पुत्र ते आमदार; अशी होती लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द

एकनाथ शिंदे म्हणाले की, भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधान झालं. त्यांच्यावर उपचार सुरू होते. जगताप हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्त्यापासून आमदारपदापर्यंत त्यांनी चांगलं काम केलं. पिंपरी-चिचवडमध्ये ते लोकप्रिय होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड येथे शोककळा पसरली आहे.

जगताप हे आजारी असताना देखील निवडणुकीच्या मतदानासाठी व्हील चेअरवर मुंबईला आले होते. ते एक निष्ठावंत आमदार होते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख पचविण्याची शक्ती मिळावी, अशी सदिच्छा शिंदे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: Laxman Jagtap Passes Away: शेतकरी पुत्र ते आमदार; अशी होती लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द

पिंपळे गुरव येथील (पिंपरी चिंचवड) रहिवासी असलेले लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द कॉंग्रेस पक्षापासून सुरू झाली. १९९२ च्या निवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले.‌ १९९७ च्या निवडणुकीतही ते निवडून आले. सलग दहा वर्षे त्यांनी पिंपळे गुरवचे प्रतिनिधित्व केले.

१९९३-९४मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते. १९९८ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. १९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या कालावधीत त्यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भुषविले. मात्र, २००३-०४ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली.